दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी ली. सांगली या संस्थेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि १८/१०/२०२० रोजी सकाळी ११.00 वाजता Live Webinar द्वारे खेळीमेळीत पार पडली.सदर सभेमध्ये मोठ्या प्रमाणांत सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वागत व प्रास्ताविक संस्थचे चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करण्यात आले.नोटीस वाचन सेक्रेटरी वसंत खांबे व प्रोसिडिंग वाचन जॉ सेक्रेटरी विजय शिरगावे यांनी केले. अहवाल व नफा वाटणी वाचन चेअरमन अभिमन्यु मासाळ,ताळेबंद वाचन व्हा.चेअरमन प्रकाश पाटील ,नफा तोटा पत्रक वाचन संचालक सुहास सूर्यवंशी ,अंदाज पत्रकापेक्षा जादा खर्च वाचन संचालक शरद पाटील ,अंदाज पत्रक वाचन संचालक गणेश जोशी , वैधानिक लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल वाचन संचालिका अश्विनी कोळेकर,वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचन संचालक जे.के पाटील,वैधानिक लेखापरीक्षणनेमणूक वाचन संचालक अरुण बावधनकर, पोटनियम वाचन संचालक पी.एन.काळे,सभेस उपस्थित नसलेल्या सभासदांना क्षमापित करणे वाचन संचालक रामचंद्र महाडिक ,आयत्या वेळी येणाऱ्या विषयाचे वाचन मलगोंडा कोरे यांनी केले .सभा संपलेनंतर संचालक अनिल पाटील यांनी आभार मानले . सभासदांनी विचारलेल्या विषय पत्रिकेवरील सर्व प्रश्नांना तसेच विषयपत्रिके व्यतिरिक्त सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे देण्यात आली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी बहुमतांनी मंजूर केले. ऑनलाईन सभेचे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल सभासदानी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला .सभेमध्ये १०% लाभांश मंजूर करणेत आला असून सभासदांच्या बँक खाती लाभांश जमा केला जाणार असल्याची माहिती यावेळी चेअरमन यांनी दिली.
सभेस संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे,प्रदीप कदम, झाकीरहुसेन चौगुले ,जाकीरहुसेन मुलाणी,शक्ती दबडे,विद्यामती रायनाडे ,राजेंद्र कांबळे ,राजू कलगुटगी ,राजेंद्र बेलवलकर,तसेच सभासद सुभाष तोडकर ,संजय व्हनमाने ,सुनील कोळी ,नाभिराज सांगले-पाटील तसेच सेक्रेटरी वसंत खांबे व सर्व कर्मचारी उपस्थित होते