रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com
GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

सॅलरी आपल्या दारी

23 Dec 2020779

सॅलरीच्या " सॅलरी आपल्या दारी " या उपक्रमास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दि सांगली सॅलरी अर्नर्स -ऑप सोसायटी ली; सांगली या संस्थे तर्फे " सॅलरी आपल्या दारी " या उपक्रमा अंतर्गत सभासदांच्या अडी अडचणी, समस्या इ. ची सोडवणूक करणेकामी तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या बहुमूल्य सूचना, मार्गदर्शन जाणून घेणेकरिता व नवीन सभासद वाढीकरिता शुक्रवार दि.११/१२/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य प्रशासकीय इमारत ,विजयनगर,सांगली येथे चेअरमन,सांगली व संस्थेचे कर्मचारी वर्ग यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल कर्मचारी संघटनेचे राजू कदम व मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संदीप सकट व ऑडीट विभागाचे मिलिंद वझे यांनी चेअर मन व संचालक यांचे पुष्प देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य प्रशासकीय इमारतीमधील विविध शासकिय कार्यालयातील सभासद तसेच इतर कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न तसेच अडीअडचणी समजावून घेऊन त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन संस्थेचे चेअरमन अभिमन्यू मासाळ यांनी दिले. यावेळी गत ५ वर्षाच्या विद्यमान संचालकांनी सभासदांकरिता व संस्थेच्या हिताकरिता राबवलेल्या व केलेल्या कामकाजाच्या आढावाचे माहितीपत्रक सर्व सभासदांना देण्यात आले. सदर उपक्रमास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभासदांनी संस्थेच्या एकंदर कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संचालकांनी संस्थेच्या भरभराटी मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे,शरद पाटील, झाकीरहुसेन चौगुले ,जाकीरहुसेन मुलाणी ,अनिल पाटील ,जे.के पाटील ,सुहास सूर्यवंशी ,अश्विनी कोळेकर ,राजेंद्र कांबळे,मलगोंडा कोरे,अरुण बावधनकर,राजेंद्र बेलवलकर,राजु कलगुटगी तसेच सेक्रेटरी वसंत खांबे व कर्मचारी उपस्थितीत होते.

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv