रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com


GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

सांगली सॅलरी अर्नर्स दिनदर्शिकेचे प्रकाशन

09 Jan 202159

सांगली सॅलरी अर्नर्स दिनदर्शिकेचे प्रकाशन
नववर्षाची सभासदांना भेट- कर्ज व्याजदर १०%

दि सांगली सॅलरी अर्नर्स को -ऑप सोसायटी लि; सांगली या संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा दि ३१/१२/२०२० रोजी सकाळी ११. वाजता संस्थेच्या प्रधान कार्यालयात श्री मिसाळ-पाटील साहेब,अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ,सांगली व श्री. नलवडे साहेब ,कार्यकारी अभियंता म्हैशाळ पंप गृह विभाग सांगली यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक लालासाहेब मोरे यांनी केले. संस्थेचे चेअरमन श्री.अभिमन्यु मासाळ यांनी दिनदर्शिका काढणे मागची संस्थेची भूमिका स्पष्ट करून संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेची सांपत्तिक स्थिती,संस्था राबवत असलेले विविध उपक्रम याची माहिती सभासद व शासकीय कर्मचाऱ्यांना व्हावी या उद्देशाने सॅलरीने दिनदर्शिका काढलेली आहे असे चेअरमन यांनी स्पष्ट केले. तसेच नववर्षाचे औचित्य साधून सर्वच कर्जाचे व्याजदर १० % केलेची घोषणा केली.
सत्कारास उत्तर देताना श्री मिसाळ-पाटील साहेब यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच सहकार क्षेत्रात सॅलरीने महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे.कर्ज देणे व ठेवी स्वीकारणे एवढेच न करता सॅलरीने सामाजिक बांधिलकी सुद्धा सांभाळलेली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी सोसायटी हि एक अभिनव संस्था असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आभार संचालक सुहास सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी संस्थेचे संचालक शरद पाटील, झाकीरहुसेन चौगुले ,जाकीरहुसेन मुलाणी, अनिल पाटील, पी.एन.काळे,अश्विनी कोळेकर,राजेंद्र कांबळे,मलगोंडा कोरे,गणेश जोशी,अरुण बावधनकर ,राजू कलगुटगी ,राजेंद्र बेलवलकर,तसेच संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.जे.के. महाडीक,डी .जी. मुलाणी ,
दिलीप पाटील,पी.वाय.जाधव,इकबाल मुलाणी,सदाशिव सूर्यवंशी, सी. एच .पाटील, सुभाष पाटील, सुभाष तोडकर, तसेच वाळवा पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण,सभासद संजय व्हनमाने , तसेच सेक्रेटरी वसंत खांबे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv