✔ सॅलरीच्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्सिजन मशिन्सचे लोकार्पण सोहळा संपन्न. ✔
दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसा. लि सांगली या संस्थेचा १०८ वा वर्धापनदिन बुधवार दि ७/१०/२०२० रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयामध्ये केक कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सध्या देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे संस्थेने नेहमीच सामाजिक जाणीव ठेवुन समाजासाठी, सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळामध्ये संस्थेच्या बऱ्याच सभासदांना व त्यांचे कुटुंबियांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संचालक मंडळाने संस्थेच्या सभासद व त्यांच्या कुटुंबियांना ऑक्सिजन चा पुरवठा तात्काळ होणेकरिता संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये एक या प्रमाणे ११ ऑक्सिजन मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत. सॅलरीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर ऑक्सिजन मशिन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी करून संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन मशिन्सचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे के महाडिक म्हणाले संचालक मंडळाने सभासदांचे हितासाठी अत्यंत चांगले व धाडसी निर्णय घेतलेले आहेत. १०८ व्या वर्धापन दिनाच्या संचालक व सभासदांना शुभेच्छा देऊन संचालक मंडळाने सांगली जिल्ह्यामध्ये संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या घेतल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले. तसेच येणारी संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आशा व्यक्त केली.
संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डी जी मुलाणी यांनी १०८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन संस्था स्थापनेपासून चा इतिहास व त्यानंतर संस्थेची झालेली भरभराट याचा आढावा घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन संस्थेच्या उल्लेखनीय कामाबद्दल गौरवोदगार व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन प्रकाश पाटील,संचालक लालासाहेब मोरे,शरद पाटील,झाकीरहुसेन चौगुले,अनिल पाटील,जे के पाटील,पी एन काळे,राजेंद्र कांबळे,मलगोंडा कोरे,सुहास सूर्यवंशी,गणेश जोशी,शक्ती दबडे,अरुण बावधनकर,अश्विनी कोळेकर,राजू कलगुटगी,राजेंद्र बेलवलकर तसेच संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेंद्र पेंडुरकर,दिलीप पाटील,पी वाय जाधव,सदाशिव सूर्यवंशी,आय जी मुलाणी ,सुभाष पाटील,सुभाष तोडकर,रामराव मोडे,नाभिराज सांगले पाटील,उदय जगताप,अरुण कांबळे तसेच संस्थेचे सेक्रेटरी वसंत खांबे व सभासद उपस्थित होते.