!!!!! सॅलरी सोसाटीची ११०वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न !!!!!
दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी ली.सांगली या संस्थेची ११० वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि १२/०६/२०२२ रोजी भावे नाट्यमंदिर सांगली येथे खेळीमेळीत पार पडली. सभासदांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री पी.एन. काळे यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करण्यात आले. सभासदानी विचारलेल्या विषय पत्रिकेवरील सर्व प्रश्नांना तसेच विषय पत्रिकेव्यतिरिक्त सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देण्यात आली. सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ व गैरप्रकार झाला नाही. सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी बहुमतांनी मंजूर केले. गत ७ वर्षात संस्थेचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल सभासदानी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व संचालक मंडळाचा सत्कार घेण्यात आला. सभेमध्ये ९. ५ % लाभांश मंजूर करणेत आला असून सभासदांच्या बँक खातेवर लाभांश जमा केला जाणार असल्याची माहिती यावेळी चेअर मन यांनी दिली. सभेस व्हा.चेअरमन मलगोंडा कोरे ,सर्व संचालक मंडळ व सेक्रेटरी वसंत खांबे व कर्मचारी उपस्थित होते.