
सॅलरीच्या चेअरमनपदी श्री. आकाराम चौगुले व व्हा. चेअरमन पदी श्री. निजाम नदाफ यांची एकमताने निवड
दि. 18/12/2025 रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स को -ऑप. सोसायटी लि; सांगली या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. आकाराम सत्याप्पा चौगुले यांची व व्हा. चेअरमन पदी श्री. निजाम आजमुद्दीन नदाफ यांची संचालक मंडळाचे सभेमध्ये एकमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून श्रीमती अनुराधा काटकर, सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली व त्यांना सहाय्यक म्हणून श्री. नितीन जामदाडे, अधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सांगली यांनी काम पाहिले. सदरची निवड एकमताने झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री. आकाराम सत्याप्पा चौगुले हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सांगली येथे कार्यरत आहेत. व श्री. निजाम आजमुद्दीन नदाफ हे जिल्हा न्यायालय सांगली येथे कार्यरत आहेत. नुतन चेअरमन यांचा सत्कार मावळते चेअरमन श्री. राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते व नुतन व्हा. चेअरमन यांचा सत्कार मावळत्या व्हा. चेअरमन सौ. सुषमा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन श्री. आकाराम चौगुले यांनी सॅलरीच्या उत्कर्षात कटिबध्द राहून संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील राहून संस्थेच्या नावलौकीकात भर घालू अशी ग्वाही दिली.