रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com
GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

  • मुख्य पान
  • बातम्या
  • सांगली सॅलरी सोसायटी लि; सांगली संस्थेच्या चेअरमनपदी श्री. झाकीरहुसेन इब्राहीम चौगुले

सांगली सॅलरी सोसायटी लि; सांगली संस्थेच्या चेअरमनपदी श्री. झाकीरहुसेन इब्राहीम चौगुले

10 Jun 2026118

दि. ०८/०६/२०२६ रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स को -ऑप. सोसायटी लि; सांगली या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. झाकीरहुसेन इब्राहीम चौगुले व व्हा. चेअरमन पदी श्री. मिलींद मोरेश्वर हारगे यांची संचालक मंडळाचे सभेमध्ये एकमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून श्रीमती अनुराधा काटकर, सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांनी काम पाहिले.सदरची निवड एकमताने झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री. झाकीरहुसेन इब्राहीम चौगुले हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था(I.T.I.)सांगली येथे कार्यरत आहेत. व श्री. मिलींद मोरेश्वर हारगे हे तालुका कृषी कार्यालय मिरज येथे कार्यरत आहेत. नुतन चेअरमन यांचा सत्कार मावळते चेअरमन श्री.आकाराम चौगुले यांच्या हस्ते व नुतन व्हा. चेअरमन यांचा सत्कार मावळते व्हा. चेअरमन श्री निजाम नदाफ यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन श्री. झाकीरहुसेन चौगुले म्हणाले, “ संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीत प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहून संस्थेच्या नावलौकीकात भर घालू अशी ग्वाही दिली.
संस्थेचे ९३४१ अ वर्ग सभासद असून २५८ कोटी ठेवी असून ३२३ कोटींचे कर्ज वाटप आहे. जेष्ठ मार्गदर्शक डी जी मुलाणी, जे के महाडिक , पी एन काळे , एस एस पाटील, पी वाय जाधव, दिलीप पाटील यांनी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला.

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv