रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com
GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

  • मुख्य पान
  • बातम्या
  • दि ०१/०७/२०२१ रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी च्या बहुउद्देशीय हॉल चा उदघाटन सोहळा संपन्न

दि ०१/०७/२०२१ रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी च्या बहुउद्देशीय हॉल चा उदघाटन सोहळा संपन्न

03 Jul 2021635

दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि., सांगली या संस्थेच्या मुख्य इमारतीच्या मागील रिकाम्या जागेमध्ये संस्थेतर्फे बहुउद्देशीय हॉलची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर नूतन बहुउद्देशीय हॉलचा उदघाटन सोहळा गुरुवार दि ०१/०७/२०२१ रोजी सांगली पाटबंधारे मंडळाचे मा. अधीक्षक अभियंता श्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन मा. श्री अभिमन्यु मासाळ व व्हा. चेअरमन मा.श्री प्रकाश पाटील यांचे हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नाईक साहेब यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक मा. लालासाहेब मोरे यांनी केले. संस्थेचे चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती करून दिली. तसेच सदर हॉलचा संस्थेच्या सभासदांना फार मोठा फायदा होणार असून नाममात्र भाडे तत्वावर सदरचा हॉल सभासदांकरिता उपलब्ध होणार असून संस्थेच्या विविध कार्यक्रमांकरिता देखील त्याचा फार मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उदघाटन प्रसंगी श्री मिलिंद नाईक साहेब यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. सॅलरी संस्थेस १०८ वर्षाचा जुना इतिहास असलेली संस्था आहे. संस्था आपल्या भक्कम पायावर उभी राहून दैदिप्यमान प्रवास करीत आहे. ९५०० सभासदांच्या सेवेस अव्याहतपणे रुजू असून सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडवत असतेच,पण याशिवाय अनेक समाजोपयोगी उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहे. तसेच सहकार क्षेत्रात सॅलरीने महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. अशी भावना व्यक्त करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी संस्थेचे संचालक जे.के.पाटील, सुहास सूर्यवंशी ,गणेश जोशी, अरुण बावधनकर , राजू कलगुटगी , तसेच माजी संचालिका अश्विनी कोळेकर,रामराव मोडे, सर्जेराव पवार , उदय जगताप , नाभिराज सांगले-पाटील , संजय व्हनमाने , आर. जे. पाटील , शिवाजी पाटील ,सुभाष तोडकर, विजय वाघोले, मुन्ना पठाण, रविकांत गुरुमूर्ती ,सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv